Home अपराध अवैधरित्या देशी आणि मोहफुलाची दारू, विदेशी दारू बाळगणाऱ्या / विकी करणाऱ्या आरोपीतांवर...

अवैधरित्या देशी आणि मोहफुलाची दारू, विदेशी दारू बाळगणाऱ्या / विकी करणाऱ्या आरोपीतांवर नागपुर ग्रामीण पोलीसांची कारवाई ११ गुन्हे नोंद एकुण ५६,८५५/- रूपयांचा मुद्देमाल जप्त

38
0

नागपुर ग्रामीण जिल्हयात दिनांक ०३/११/२०२५ रोजी दारूबंदी कायद्या अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीसांनी अवैधरित्या दारू बाळगुन विक्री करणाऱ्यांवर तसेच सेवन करणाऱ्यांवर छापा टाकुन देशी दारू, मोहाफुल दारू विदेशी दारू असा एकुण ५६,८५५/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस स्टेशन कोंढाळी येथे आरोपी नामे दिपकसिंग अंनतसिंग भोंड, वय ४८ वर्ष, रा. सायखोड, कोंढाळी आणि नरेश भिमरावजी सोनबरसे वय ४२ वर्ष रा. सायखोड कोंढाळी पोलीस स्टेशन काटोल येथे आरोपी नामे आरोपी नामे १) घनशाम कुडलींकराव तांदळे, रा. रेवतकर लेआउट काटोल २) गजानन रामदासजी शिरसागर रा. मेढेपठार ता. काटोल यांचेवर प्रत्येकी १ गुन्हा नोंद आहे. तसेच दोन महीला अरोपी यांचेवर १ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन वेलतुर येथे आरोपी नामे ताराचंद नत्थु पाटील, वय ५० वर्ष, रा. पचखेडी याचेवर १ गुन्हा नोंद आहे, पोलीस स्टेशन कुही येथे महीला आरोपीवर १ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन रामटेक येथे आरोपी नामे १. विलास लक्ष्मण तरारे, वय ४३ वर्षे, २. अर्जुन धोडबा तरारे दोन्ही रा. पंचाळा बु त रामटेक यांचेवर १ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन सावनेर येथे आरोपी १. नारायणओमकार सोनवाने, वय ४० वर्ष, रा. वार्ड क. १२ जाामा मस्जिद जवळ ता सावनेर, २. ज्ञानेश्वर उर्फ नाना शालिकराम उईके, वय ४० वर्षे, रा. बाभुळखेडा, ता. कामठी, जि. नागपुर ३. संजय दिनकर खडतकर, वय ४१ वर्षे, रा. वार्ड नं. ५ पाटनसावंगी ता. सावनेर, जि. नागपुर यांचेवर प्रत्येकी १ गुन्हा नोंद आहे. तसेच आरोपी नामे १) नंदकिशोर गुनाजी डांगे, वय ४० वर्षे, राह. वार्ड नं. ०२ बस स्टॉप जवळ तेलकामठी २) नितीन देशमुख राह. तेलकामठी, ३) राजु कश्यप रा. सावनेर यांचेवर १ गुन्हा नोंद आहे. अशा आरोपीतांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये ११ गुन्हे दाखल केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here