Home Breaking News तालुक्यात कोरोनामुळे बैलगाडा शर्यतीला ब्रेक

तालुक्यात कोरोनामुळे बैलगाडा शर्यतीला ब्रेक

120
0

मुख्य सम्पादक दिलीप घोरमारे
सावनेर ता. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय दिला न्यायालयाच्या या निर्णयाचे तालुक्यातील बैलगाडा शर्यत शौकीनांनी  स्वागत केले.तालुक्यात काही ठिकाणी आयोजकांनी जानेवारी महिन्यात तीळ संक्राती मध्ये शंकर पट भरविण्यासाठी जागेची निवड करून तयारी केली परंतु तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊन दिवसेंदिवस ग्रामीण व शहरी भागात कोरोना रुग्णसंख्या वाढायला लागल्याने आयोजकांनी यंदा शंकर पट भरविण्याचा निर्णय रद्द केला आहे.
विदर्भात शेतीचे हंगाम संपल्यानंतर शेतकरी स्वतःच्या मनोरंजनासाठी बैलांच्या शंकर पटाचे आयोजन करत होते.परंतु जवळपास मागील दहा वर्षापासून काही कारणांमुळे यावर न्यायालयाने बंदी घातल्यापासून बैलगाडा शौकीन शेतकऱ्यांमध्ये पसरलेल्या नाराजीमुळे राज्य शासनाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने बैल गाडी शर्यतीला काही अटीवर परवानगी दिली.बंदी उठविण्याच्या निर्णयामुळे बैलगाडा शौकीनांमध्ये चांगलाच उत्साह संचारला शेतकऱ्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करून राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचे पुढे बैलगाडा उभा करून आभार व्यक्त केले होते.काही बैलगाडा शौकिनांनी शंकर पट भरविण्याचे नियोजन करणे सुरू केले होते परंतु तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने बरेच कार्यक्रम रद्द केले जात आहे याच धर्तीवर यंदा शंकर पट भरविण्याचा निर्णय आयोजकांनी रद्द केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here