रिपोर्ट सावनेर दिनेश चौरशिया
*समाजिक विकासातूनच संस्थेची प्रगती शक्य !*- शंकर घोरसे यांचे प्रतिपादन: महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार सोहळा
ग्रामीण भागातील समाज घटकांच्या आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक तथा कृषी विकासासाठी पुढाकार घेऊन कार्य करणे तसेच छोटे-मोठे उद्योगधंदे करणाऱ्यांना चालना देऊन ग्रामीण जीवनमानामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे असे उद्दिष्ट ठेवून संस्था कार्यरत असल्यामुळे संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होते. यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करून संस्था समाजभिमुख व्हावी तथा ग्रामीण भागातील प्रतिनिधित्व संस्थेच्या कार्यकारी मंडळावर यावे असे मत महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूर येथील माजी संचालक शंकर घोरसे यांनी व्यक्त केले.
प्रियदर्शनी महिला सहकारी पतसंस्था व क्षत्रीय लोणारे माळी समाज पंचकमिटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रेशीमबाग नागपूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या नवनियुक्त संचालकांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते.तर सहकार क्षेत्रातूनच समाजाची प्रगती साधली जाऊ शकते करिता ग्रामीण भागात समाजाच्या अधिकाधिक सहकारी संस्था निर्माण व्हाव्यात यासाठी लागेल ते सहकार्य व मार्गदर्शन करण्याचे अभिवचन महात्मा फुले शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित संचालक तथा सहकारी संस्थांचे उपनिबंधक राजेंद्र वाघे यांनी उपस्थितांना अभिवचन दिले. समाज रोजगारभिमुख बनविण्यासाठी व शासनाच्या योजना समाजापर्यंत पोचविण्यासाठी अधिकाधिक युवकांना प्रशिक्षण व रोजगार शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याची तयारी महात्मा फुले शिक्षण संस्थेतील नवनिर्वाचित संचालक देवेंद्र काटे यांनी दर्शविली.
संत सावता माळी यांच्या पुतळ्याला व महात्मा ज्योतिबा फुले तथा सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यमाची सुरुवात झाली.
अध्यक्षस्थानी माळी समाज पंच कमिटीचे अध्यक्ष किशोर घोळसे होते . महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संचालक देवेंद्र काटे,संचालक राजेंद्र वाघे माजी संचालक शंकर घोरसे प्रमुख पाहुणे होते.यावेळी नगरसेवक सुनील चापेकर,दिवाकर नारेकर, माजी नगरसेवक रामभाऊ ऊमाटे, प्रियदर्शनी महिला सहकारी बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सुधा धांडोळे,उपाध्यक्ष स्नेहा नारेकर, संचालिका भारती घोळसे, व्यवस्थापक सचिन ठाकरे,प्रशांत घोळसे,नामदेव चरपे, गुलाबराव भुडके, महतपुरे गुरुजी,वसंता चाफेकर,शेषराव वाढीकर,सुरेश चरपे, शशिकांत धांडोळे,सतिश बनकर, गजानन सातपुते, उमेश भुडके,पंकज वाडबुधे,सुहास चरपे,हितेश बनकर, मारुती नारेकर,शेखर बनाईत, निलेश वाडबुधे,सागर महतपुरे आदीं मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात महात्मा फुले शिक्षण संस्थेतील नवनियुक्त संचालक देवेंद्रजी काटे व राजेंद्र वाघे तथा माजी संचालक शंकर घोरसे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच प्रियदर्शनी महिला सहकारी पतसंस्थेच्या कार्याबद्दल संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा व क्षत्रिय लोणारे माळी समाज पंचकमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नवनियुक्त संचालकांनी ग्रामीण भागातील माळी समाज हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल व शेतीप्रधान असल्यामुळे संस्थेने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम राबवावे तसेच युवकांसाठी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यावर भर द्यावा अशी मागणी आयोजकांनी केली. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक रामभाऊ उमाटे यांनी केले.तर आभार मनोहर घोळसे यांनी मानले.




