Home Breaking News भा.ज.प च्या ओबीसी आघाडीच्या कळमेश्वर तालुका अध्यक्ष व सदस्यत्व अशा दोन्ही पदाचा...

भा.ज.प च्या ओबीसी आघाडीच्या कळमेश्वर तालुका अध्यक्ष व सदस्यत्व अशा दोन्ही पदाचा मनोज मांडवगडे यांच्या राजीनामा !

144
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक 25 जुलै 2025 रोजी भाजपचे ओबीसी आघाडीचे तालुका अध्यक्ष मनोज मांडवगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा डॉ. राजीव पोतदार भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य व प्रमोद हत्ती कळमेश्वर तालुका अध्यक्ष भाजपा यांना राजीनामा दिला आहे.
भारतीय जनता पक्षांमध्ये मनोज मांडवगडे यांनी गेल्या अनेक वर्षापासून बुध अध्यक्ष, महामंत्री, शक्ती केंद्रप्रमुख व आता भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी अध्यक्ष कळमेश्वर तालुका या पदा पर्यंत भारतीय जनता पक्षाची संपूर्ण सावनेर विधानसभा क्षेत्रात हालाखीची परिस्थिती असताना काम केले असून तेलकामठी जिल्हा परिषद सर्कल मध्ये सर्व समाजातील व सर्व गावातील शेवटचे व्यक्तीपर्यंत पक्ष वाढीसाठी भेदभाव न करता काम केले आहे. त्याचा एक संदेश म्हणजेच नुकतेच झालेली विधानसभा निवडणुकीत आमदार डॉ.आशिष देशमुख यांना मिळालेला विजय हा सुद्धा आहे.
ते मुळचे धनोजे कुणबी समाजातील एक नवीन नेतृत्व असून त्यांनी तेलकामठी जिल्हा परिषद सर्कल मध्ये समाजामध्ये आपल्या कामगिरीच्या भरोशावर सर्वसामान्यांमध्ये आपलं प्रभुत्व निर्माण केलं होतं.
अशा व्यक्तीने भारतीय जनता पक्षाचा ओबीसी आघाडीचा कळमेश्वर तालुका अध्यक्ष व भाजपा सदस्यत्व अशा दोन्ही पदाचा राजीनामा दिल्यामुळे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीमध्ये कळमेश्वर तालुक्यात पक्षाला खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here