Home सांस्कृतिक व सामाजिक सावनेरात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा – नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

सावनेरात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा – नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

41
0

सावनेर
दि.२१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पतंजलि योग परिवार सावनेर आणि नगरपरिषद सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरपरिषद प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात सावनेर मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामूहिक योगासने केली.
कार्यक्रमाला नगराध्यक्षा संजना मंगळे,मुख्याधिकारी अर्शिया जूही,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रामराव मोवाडे, नगर उपाध्यक्ष राजू घुगल, निलेश पटे, राजू भुजाडे आणि सुचिता सूरे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी पतंजलि योग समितीचे मुख्य योग प्रशिक्षक भरत थापा यांनी उपस्थित नागरिकांना योगासन, प्राणायाम आणि ध्यानसाधना यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. तसेच बदलत्या जीवनशैलीत विविध आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी योगसाधना कशी महत्त्वाची आहे, याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंजलि योग समितीच्या अनेक सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.यामध्ये कैलाश शर्मा, मनोहर दिवटे,चैतन्य ठाकरे, राहुल सावजी, गुलाबराव टेकाडे, अरुण रुषीया, मदन शेंडे, सुरेश चरपे,महिला प्रभारी मानवती थापा, सहप्रभारी विविधा उमाठे, सुनीता टेकाडे, कमल पैगवार, ममता भोंगाडे, करिश्मा मेश्राम, मोनिका सोनभद्रे, वंदना महाकालकर, मेघा कडू, दुर्गा फरकसे, कविता तागडे, भारती मोरे, वनिता महल्ले, वैशाली गुरकरी, श्रुती डवले, शिला गुप्ता, सविता सातपुते, हेमलता पांडे, रश्मी काळे, अंशुधा सुपरटकर, विद्या उकंडे, राजश्री जीवतोडे, माधुरी अम्बरते, प्रीति भाट, सविता हुडकर, तितिक्षा लोही, वैशाली साबळे, विनय वाघमारे, दीपक हरणे, योगेश लाखानी, होमेश चोपडे, प्रकाश नाईक, श्याम पांडे, ज्ञानेश्वर महाकालकर, गंगाधर माडेकर, किशोर घोळसे, संजय टेकाडे, उमेश मोरे, रविन्द्र लोही, हरीश पानपत्ते, सुरेश चाचरकर, कृष्णकुमार पण्डोले आणि देवेंद्र ठोंबरे यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन वेदश्री देशपांडे यांनी केले,तर उपस्थितांचे आभार प्रसिद्ध कवी जयसियाराम यादव यांनी मानले. संपूर्ण परिसरात अत्यंत उत्साही आणि चैतन्यमय वातावरणात या योग दिनाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here