Home सामाजिक जीवन विकास म्हणजे तुमच्या ध्येयांना पंख तसेच उडण्याचे बळ देण्याची कार्यशाळा आहे...

जीवन विकास म्हणजे तुमच्या ध्येयांना पंख तसेच उडण्याचे बळ देण्याची कार्यशाळा आहे अनिरुद्ध तळेगावकर

36
0

उमरेड तालुका प्रतिनिधी
जीवन विकास परिवार उमरेड यांच्यातर्फे आयोजित जीवन विकास विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तथा जीवन विकास वनिता विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम अनिरुद्ध तळेगावकर आपल्या भाषणात म्हणाले आई-वडिलांनी केलेला संघर्ष डोळ्यासमोर ठेवा, जीवन विकास म्हणजे तुमच्या ध्येयांना पंख तसेच उडण्याचे बळ देण्याची कार्यशाळा आहे. आपल्या तीनही भाषा समृद्ध ठेवा तरच तुम्ही जगात टिकाल असे विचार त्यांनी मांडले.
या अभय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 2025 26 च्या परीक्षेमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी अनिरुद्ध तळेगावकर यांनी आपल्या भाषणातून मार्मिक व प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. वर्ग बारावी विज्ञान मध्ये शाळेतून पहिली येण्याचा मान गोपिका विनोद मस्की, द्वितीय मयुरी अशोक मराठे, तृतीय प्रीती प्रेमदास पराते, कला विभागामधून शर्वरी नथू मेश्राम, सलोनी प्रकाश आंबुलकर, अर्चना अभय लाडे, एच एस सी व्ही सी या विभागातून अंकिता बावणे, अनिशा गजघाटे, समृद्धी बोकडे तर दहाव्या वर्गातून प्रथम येण्याचा मान अथर्व योगेश देवीकर, आदित्य योगेश्वर गुडेकर, पार्थ प्रमोद बोकडे यांनी मिळविला तसेच जीवन विकास वनिता विद्यालयातून वैष्णवी ढकाते, द्वितीय क्रमांक पारुल मोनगसे तर तृतीय क्रमांक विभा भोगे यांनी क्रमांक मिळविला या विद्यार्थ्यांचा शाल, मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष जीवन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रा. गो. पराते तसेच प्रमुख अतिथी प्रशांत सपाटे, सुरेश झुर्मुरे, बा. रा. बोकडे, गो. तु. लटे, अजय घाटे, अ.रा. मेष्राम, प्रणय पराते प्रामुख्याने उपस्थित होते तसेच जीवन विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनेश चुऱ्हे, जीवन विकास वनिता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा टोंग, जीवन विकास विद्यालयाचे उपमुख्याध्यापक पांडुरंग चौधरी, उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विवेक सातेलवार, पर्यवेक्षक विशाल बंड व संजय दाडे उभय विद्यालयाचे शिक्षक वृंद तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी फार मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमा कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश चुऱ्हे ,पाहुण्यांचा परिचय जगदीश लडके यांनी करून दिला. सूत्रसंचालन अनिता मोहोतकर, विशाखा उगे, अमिता वाकडे, आभार प्रदर्शन वर्ष टांग यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here