Tuesday, 3 November 2026Online News Portal
BREAKING NEWS
तेलकामठीत शेतकऱ्यांचा भूसंपादन मोजणीला विरोध – उपजिल्हाधिकाऱ्यांसोबत अधिकृत बैठक झाल्याशिवाय इंचभरही जमीन मोजू देणार नाही!मुख्याध्यापिका रमा बोचरे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न!डॉ.अभिविलास नखाते यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बळीराजा महोत्सवाची यंदाही जय्यत तयारी!पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी आतापासूनच पाणी जपून वापरा! – तहसीलदार विकास बिक्कड यांचे नागरिकांना आवाहनतेलगाव येथे श्री गोविंद प्रभू मंदिराचे भूमिपूजन उत्साहात संपन्न!इंडिया लाईव्ह तेज न्यूजच्या सहाय्यक संपादक पदी गोपाल दादा घटे यांची नियुक्ती मुख्य संपादक दिलीप घोरमारे यांच्याकडून नियुक्तीपत्र प्रदान; डिजिटल माध्यमाच्या पुढील वाटचालीसाठी प्रयत्नशील राहणारएनआयटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये ‘नृत्यरंग’ दांडिया महोत्सवाचा जल्लोष!केसर नाला पाणीटंचाईच्या बातमीची दखल! पितांबर ईखार यांचा मोफत टँकरने पाणीपुरवठ्याचा पुढाकार!
Breaking News

तेलकामठीत शेतकऱ्यांचा भूसंपादन मोजणीला विरोध – उपजिल्हाधिकाऱ्यांसोबत अधिकृत बैठक झाल्याशिवाय इंचभरही जमीन मोजू देणार नाही!

India Live Tej
03 Nov 20261 वाचने

गिरीश आंदे
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (NMRDA) माध्यमातून होत असलेल्या तिसऱ्या आउटर रिंग रोडसाठी कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी येथे मंगळवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजतापासून भूसंपादन मोजणीची प्रक्रिया राबविण्यात येणार होती. उपभूमी अभिलेख कार्यालय, कळमेश्वर यांच्या वतीने भुकरमापक अनिल दवणे यांच्या उपस्थितीत मोजणीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, बाधित शेतकऱ्यांनी सामूहिक विरोध दर्शविल्याने मोजणी प्रक्रिया थांबविण्यात आली.
यावेळी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने नोडल अधिकारी उमेश शिरपूरकर व ग्राम महसूल अधिकारी एस.पो.पाटील उपस्थित होते. तर महसूल विभागाच्या वतीने तेलकामठीचे ग्राम महसूल अधिकारी इरफान जानीवाले, माजी महसूल सेवक चंद्रभान पाटील आवश्यक महसूल अभिलेखांसह उपस्थित होते.
तेलकामठी येथील भूसंपादनामुळे बाधित होणारे शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. मोजणीची प्रक्रिया सुरू होताच शेतकऱ्यांनी एकजुटीने विरोध दर्शविला. ‘आमच्या जमिनीची इंचभरही मोजणी होऊ देणार नाही,’ असा ठाम निर्धार व्यक्त करीत शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध केला. त्यामुळे प्रशासनाला मोजणी प्रक्रिया थांबवावी लागली.
जोपर्यंत उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी (वि. पा. वि. म. क्र. ३) हे बाधित शेतकऱ्यांसोबत अधिकृत बैठक घेऊन भूसंपादनासंदर्भातील संपूर्ण माहिती देत नाहीत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत कोणतीही मोजणी अथवा पुढील कार्यवाही करू दिली जाणार नाही, असा ठाम इशारा तेलकामठी येथील बाधित शेतकऱ्यांनी दिला.
भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पारदर्शकपणे माहिती देण्यात यावी. तसेच जमिनीच्या मोबदल्यासह भूसंपादनाशी संबंधित सर्व प्रश्नांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक आयोजित करावी, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. त्यामुळे तिसऱ्या आउटर रिंग रोडच्या भूसंपादनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

error: Content is protected !!