Wednesday, 28 October 2026Online News Portal
BREAKING NEWS
तेलगाव येथे श्री गोविंद प्रभू मंदिराचे भूमिपूजन उत्साहात संपन्न!इंडिया लाईव्ह तेज न्यूजच्या सहाय्यक संपादक पदी गोपाल दादा घटे यांची नियुक्ती मुख्य संपादक दिलीप घोरमारे यांच्याकडून नियुक्तीपत्र प्रदान; डिजिटल माध्यमाच्या पुढील वाटचालीसाठी प्रयत्नशील राहणारएनआयटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये ‘नृत्यरंग’ दांडिया महोत्सवाचा जल्लोष!केसर नाला पाणीटंचाईच्या बातमीची दखल! पितांबर ईखार यांचा मोफत टँकरने पाणीपुरवठ्याचा पुढाकार!केसर नाला पाणीटंचाईच्या बातमीची दखल ! पितांबर ईखार यांचा माणुसकीचा पुढाकार!सावनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे धर्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनहरविलेले ९ मोबाईल पुन्हा मालकांच्या हाती – सावनेर पोलिसांची यशस्वी कामगिरी!केसर नाल्यातील पाणीसाठा घटला – चार गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर!
सांस्कृतिक

तेलगाव येथे श्री गोविंद प्रभू मंदिराचे भूमिपूजन उत्साहात संपन्न!

India Live Tej
28 Oct 20261 वाचने

गिरीश आंदे
महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गोविंद प्रभू मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन तेलगाव येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आले. प.पू. प.म. आचार्य श्री मोठे बाबा, जाधववाडी यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात संत-महंतांच्या शुभहस्ते भूमिपूजन विधी पार पडला.
या सोहळ्याला म. डॉ. दादा अनंतराजमुनी, अंकुळनेरकर शाखा आबासाहेब बाबासाहेब, गुरुताई त.प.पू. ब्रह्मतनया ताई, त. प्रमिलाताई अंकुळनेरकर तसेच म. सुज्ञ दादा यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या शुभहस्ते मंदिराच्या भूमिपूजनाचा विधी पार पडला. यावेळी उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने सहभाग घेतला.
श्री गोविंद प्रभू मंदिराच्या उभारणीच्या निमित्ताने तेलगाव परिसरातील महानुभाव पंथीयांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि आध्यात्मिक विचारांचा वारसा जतन करण्याच्या दृष्टीने या मंदिराचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
या कार्यक्रमाला सद्भक्त विकास गावंडे,गजानन ढवंगाळे (नागपूर) यांच्यासह तेलगाव येथील महानुभाव पंथीय मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. यामध्ये सुरेश ढवंगाळे,दादाराव भिंगारे,शिवाजी ढवंगाळे, नत्थुजी महाजन, देवराव ढवंगाळे, दिनेश वाकोडे, किसना ढवंगाळे, मोरेश्वर भिंगारे, प्रमोद वाकोडे आणि शरद ढवंगाळे यांचा समावेश होता.
संत-महंतांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भूमिपूजन सोहळ्यामुळे तेलगावच्या धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना भाविकांमध्ये व्यक्त होत होती. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहाने पार पडला.

संबंधित बातम्या

error: Content is protected !!