गिरीश आंदे
धर्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्या वतीने बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सावनेर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सावनेर शहराध्यक्ष गोपाल घटे, तालुकाध्यक्ष सुरेंद्र वानखडे, शहर सचिव भगवान रायकवाड, अमोल डहाट, ज्ञानेश्वर लांजेवार, सोनू भुते, देवेंद्र माने, रत्नमाला रागोसे, बेबी बांबोडे, रुखमा खोब्रागडे, रंजना ढोके, प्रिया सीरसाठे, किसान घोडमारे आणि ताजने (सरपंच) यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.
Home Breaking News सावनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे धर्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब...




