Home सांस्कृतिक व सामाजिक कविवर्य सुरेश भट सभागृहात शिवकालीन वैभवाचा जागर ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ हाऊसफुल्ल

कविवर्य सुरेश भट सभागृहात शिवकालीन वैभवाचा जागर ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ हाऊसफुल्ल

47
0

गिरीश आंदे
नागपूर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा इतिहास रंगमंचावर जिवंत करणाऱ्या ‘द किरण माने शो : स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या महानाट्याचा रौप्य महोत्सवी प्रयोग नागपूरमध्ये दणक्यात पार पडला. कविवर्य सुरेश भट सभागृहात १४ जुलै रोजी झालेल्या या प्रयोगाला रसिकांची तुफान गर्दी झाली असून कार्यक्रम हाऊसफुल्ल ठरला.
या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने महासम्राट बळीराजा राष्ट्र सेवा संघ, नागपूर यांच्या वतीने विवेकी कलावंत, लेखक आणि प्रबोधनकार शिवश्री किरण माने यांना ‘महासम्राट बळीराजा सांस्कृतिक प्रबोधनकार गौरव पुरस्कार–२०२६’ प्रदान करण्यात आला. २५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रा.डॉ.अभिविलास नखाते यांच्या हस्ते किरण माने यांचा गौरव करण्यात आला. कला, अभिनय आणि सामाजिक प्रबोधनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
किरण माने आणि त्यांच्या ३० सहकाऱ्यांनी सादर केलेल्या महानाट्यात भव्य नेपथ्य, आकर्षक प्रकाशयोजना, प्रभावी संगीत आणि दमदार अभिनयाचा मिलाफ पाहायला मिळाला. कलाकारांच्या सशक्त सादरीकरणामुळे प्रेक्षकांना शिवकालीन इतिहासाचा थरारक अनुभव मिळाला.
इतिहास केवळ पुस्तकात न राहता तो रंगमंचावरून जनमानसापर्यंत पोहोचवण्याचे काम ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या महानाट्याने केले आहे. नागपूरच्या सांस्कृतिक विश्वात या प्रयोगाने आपली वेगळी ओळख निर्माण केली असून रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने रौप्य महोत्सवी प्रयोग संस्मरणीय ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here