Home कृषी तेलकामठी येथे अन्या सुपर ग्रीन्स प्रा.लि.च्या नवीन प्रकल्पाचे उद्घाटन – आमदार डॉ....

तेलकामठी येथे अन्या सुपर ग्रीन्स प्रा.लि.च्या नवीन प्रकल्पाचे उद्घाटन – आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ

30
0

गिरीश आंदे
तेलकामठी येथे दिनांक २२जुलै २०२६ रोजी अन्या सुपर ग्रीन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नवीन प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या प्रकल्पाचे उद्घाटन सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
अन्या सुपर ग्रीन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक कुमार नटराजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून आधुनिक शेती, पर्यावरण संवर्धन आणि हरित विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, अशा नाविन्यपूर्ण प्रकल्पांमुळे शाश्वत विकासाला चालना मिळेल, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार होईल आणि पर्यावरणपूरक शेतीला बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी आयोजकांचे अभिनंदन करून प्रकल्पाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन समारंभास तालुका कृषी अधिकारी दिपाली कुंभार, भाजप नागपूर ग्रामीण (काटोल) जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तेलकामठी (सर्व्हे क्र. २८४), ता. कळमेश्वर, जि. नागपूर येथे उभारण्यात आलेला हा प्रकल्प नैसर्गिक, शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here