Thursday, 19 November 2026Online News Portal
BREAKING NEWS
नागरिकांच्या मागणीची दखल;तेलकामठी आरोग्य उपकेंद्राच्या संरक्षण भिंतीबाबत जिल्हा आरोग्य विभागाचा खुलासा;कंत्राटदाराने स्वखर्चातून केल्याचे स्पष्ट!तेलकामठी आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह! जुन्या संरक्षण भिंतीचीच दुरुस्ती करून नव्याने बांधकाम केल्याचा आरोप – चौकशी करून कारवाईची ग्रामस्थांची मागणीकळमेश्वर दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांमार्फत आर्थिक वसुलीचा संशय! शेतकऱ्यांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार – वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीची मागणीउच्च न्यायालयाच्या कामकाजात मराठी भाषेला स्थान द्या! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रिया रमेश मानकर यांची निवेदनाद्वारे मागणीइयत्ता सहावीपासून शालेय अभ्यासक्रमात ‘संविधान’ हा स्वतंत्र विषय समाविष्ट करा – प्रिया मानकर यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी;कोहळी येथील दौऱ्यात दिले निवेदनश्री जगनाडे महाराज नागरी सहकारी पतसंस्था के अध्यक्ष पद पर डॉ. योगेश पाटील, संचालक पद पर जयंत पाटीलश्रीलंका दौऱ्यासाठी निवड झालेल्या ध्रुव पिसे यांचा तेली युवा एकता मंचातर्फे सत्कार – तरुणांसमोर ठेवला प्रेरणेचा आदर्श🪔 शुभ दीपावली! साईकृपा ऑटोमोबाईलची दिवाळी धमाका ऑफर – तुमच्या स्वप्नातील गाडी आता आपल्या शहरात!
आरोग्य

नागरिकांच्या मागणीची दखल;तेलकामठी आरोग्य उपकेंद्राच्या संरक्षण भिंतीबाबत जिल्हा आरोग्य विभागाचा खुलासा;कंत्राटदाराने स्वखर्चातून केल्याचे स्पष्ट!

India Live Tej
19 Nov 20261 वाचने

गिरीश आंदे
तेलकामठी येथील नवीन आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामातील संरक्षण भिंतीच्या कामाबाबत ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची जिल्हा आरोग्य विभागाने दखल घेत अधिकृत खुलासा केला आहे. ६१.१९ लाख रुपयांच्या मंजूर निधीत संरक्षण भिंतीच्या कामाचा समावेश नसून, संबंधित कंत्राटदाराने परिसरातील जुनी व अर्धवट तुटलेली संरक्षण भिंत स्वतःच्या खर्चातून दुरुस्त केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ व्या वित्त आयोगांतर्गत मौजा तेलकामठी येथे नवीन आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या बांधकामाला २ नोव्हेंबर २०२५ रोजी भूमिपूजन करून सुरुवात करण्यात आली होती. या कामासाठी ६१.१९ लाख रुपयांचा निधी मंजूर असून, कामाचे कंत्राट मे. आशीष दयानंद तारु यांना देण्यात आले आहे. सध्या या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.
दरम्यान,उपकेंद्राच्या संरक्षण भिंतीच्या कामाबाबत ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवित जुन्या भिंतीचीच दुरुस्ती करून रंगरंगोटी करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच मंजूर निधीतून प्रत्यक्षात कोणती कामे करण्यात आली, याची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली होती. या संदर्भात १७ नोव्हेंबर २०२६ रोजी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.
या वृत्ताची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर यांनी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत पत्राद्वारे खुलासा पाठविला आहे. त्यामध्ये आरोग्य उपकेंद्राच्या मुख्य इमारतीच्या बांधकामासाठीच ६१.१९ लाख रुपयांचा निधी मंजूर असून, मंजूर अंदाजपत्रकात आवारभिंत अथवा संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा समावेश नसल्याचे नमूद केले आहे.
तसेच इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील आवारभिंत अर्धवट व तुटलेल्या अवस्थेत असल्याने उपकेंद्राच्या संरक्षणाच्या दृष्टीने कंत्राटदाराने ती स्वखर्चातून दुरुस्त केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी कंत्राटदाराला कोणत्याही प्रकारचे देयक अदा करण्यात आलेले नाही किंवा भविष्यातही देण्यात येणार नसल्याचे खुलाशात नमूद करण्यात आले आहे.
शासकीय विकासकामांमध्ये पारदर्शकता असावी, तसेच सार्वजनिक निधीचा योग्य विनियोग व्हावा, या उद्देशाने ग्रामस्थांनी संरक्षण भिंतीच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर संबंधित विभागाने लेखी स्वरूपात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि प्रशासनाने दिलेला खुलासा या दोन्ही बाबी आता चर्चेचा विषय ठरत आहेत.
दरम्यान,नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना प्रशासनाने अधिकृत उत्तर दिल्याने या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर आणण्यास मदत झाली आहे. शासकीय कामांबाबत नागरिकांनी प्रश्न विचारणे आणि संबंधित प्रशासनाने त्यावर पारदर्शकपणे खुलासा करणे, ही लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाची बाब मानली जात आहे.

संबंधित बातम्या

error: Content is protected !!