रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची थेट कोरोना चाचणी
सावनेर ता. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी संचार बंदीचा आदेश असतानाही बरेच नागरिक याबाबत गंभीर दिसत नाहीत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण घराबाहेर पडत आहे अशा नागरिकांना अटकाव करण्यासाठी शहरात व ग्रामीण भागात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे त्यानुसार सावनेर शहरातील रस्त्यांवर पोलिसांचा बंदोबस्त व फिरते आरोग्य पथक तैनात असुन पोलीस बंदोबस्ता दरम्यान विनाकारण रस्त्यांवर आढळून आलेल्या नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहे.पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या रुग्णाला शासकीय कोविड सेंटरमध्ये दाखल केल्या जात आहे.बुधवारी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे ,पोलीस निरीक्षक मारुती मुळुक, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप गुजर आदींच्या उपस्थितीत पोलिसांच्या बंदोबस्तात दरम्यान विनाकारण रस्त्यांवर आढळून आलेल्या163 जणांच्या चाचण्या करण्यात आल्यात यात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या एका रुग्णाला औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले




