Home शैक्षणिक कृषी महाविद्यालय नागपूर च्या माजी विद्यार्थ्यांचा वीस वर्षानंतर चा गेट-टुगेदर

कृषी महाविद्यालय नागपूर च्या माजी विद्यार्थ्यांचा वीस वर्षानंतर चा गेट-टुगेदर

110
0

तब्बल वीस वर्षानंतर कृषी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. विज्ञान संस्था नागपूरच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे असोसिएट डिन डॉ. विलास आतकरे , विशेष अतिथी म्हणून कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी हेमंत खराबे पोलीस उपअधीक्षक, वरिष्ठ संशोधक रामकृष्ण इडूपुगांती तसेच वरिष्ठ विद्यार्थी उपस्थित होते. एवढ्या वर्षानंतर भेटल्यामुळे प्रत्येकाचा उत्साह ओथंबून वाहत होता. स्नेह मिलनाच्या मेळाव्याला नागपूर सोबतच मुंबई ,बडोदा हैदराबाद, औरंगाबाद ,पुणे ,जबलपूर येथील विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी राजकीय ,शिक्षण, उद्योग सामाजिक ,सांस्कृतिक, बैंकिंग , विमा क्षेत्रात मोठी कामगिरी करत आहेत. आपल्या यशाचे श्रेय हे आपल्या महाविद्यालयीन जीवनालाच आहे अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.आयोजन समिती द्वारे आयोजित क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. भक्ती गीत,भावगीत, चित्रपट गीत गायनाने कार्यक्रमात आणखीनच रंगत भरली. एवढ्या वर्षानंतर भेटल्यामुळे अर्थातच सर्वांसाठी हे भावनिक क्षण होते. महाविद्यालयीन जीवनातील वेगवेगळ्या आठवणी प्रसंगी दंगामस्ती यांनी गप्पांचा फड चांगलाच रंगला. आजच्या स्नेहमिलनातील कार्यक्रमाच्या आठवणी पुढील आयुष्य जगताना एक रंगीत खुमारी देईल अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची प्रतिमा असलेले मेमेंटो भेट देण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनात गजेंद्र वाळके, विशाल ठाकरे, सत्यपाल ठाकरे,मनीष अडागळे, मनीष अदानी,ईश्वर दुणेदार, नरेंद्र वैद्य, अतुल देवकर, अमोल गोरे,अजय नितनवरे यांचा विशेष सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here