Home शैक्षणिक शैक्षणिक निर्मिती स्पर्धेत जिल्हा परिषद खुर्सापार चे शिक्षक श्री प्रदिप पडवाल...

शैक्षणिक निर्मिती स्पर्धेत जिल्हा परिषद खुर्सापार चे शिक्षक श्री प्रदिप पडवाल सर यांची उज्वल कामगिरी

143
0

सावनेर
दि.२५ फेब्रुवारी २०२५ ला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नागपूर द्वारा आयोजित शैक्षणिक निर्मिती स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खुर्सापार येथील शिक्षक श्री. प्रदीप पडवाल सर यांनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत सावनेर तालुक्यात प्रथम क्रमांक, तसेच नागपूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे शाळेचा आणि तालुक्याचा सन्मान वाढला आहे.
या स्पर्धेत जिल्हाभरातील अनेक शिक्षकांनी सहभाग घेतला होता. श्री. पडवाल सरांनी सादर केलेली शैक्षणिक निर्मिती विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेस उपयुक्त ठरेल, असे परीक्षकांचे मत होते. त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना आणि अध्यापन कौशल्यामुळे त्यांना हा मानाचा क्रमांक मिळाला आहे.गटशिक्षणाधिकारी श्री. कश्यप सावरकर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. पुरुषोत्तम मुंडे व श्री. जितेंद्र ठाकरे, तसेच केंद्रप्रमुख श्री. राजेंद्र भलवतकर यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या यशामुळे शैक्षणिक प्रयोगशीलतेला चालना मिळेल आणि इतर शिक्षकांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
श्री.पडवाल सरांचे कृतज्ञता व्यक्त करताना शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि सहकारी शिक्षकांनीही त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here