गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर :
आज दिनांक ०८ मे २०२५ रोज गुरुवारला १२.०८ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांच्याकडे शेतकरी देविदास बाबुराव तुरणकर रा.तेलकामठी ता.कळमेश्वर जि.नागपुर यांनी ऑनलाईन पंचायत समिती कळमेश्वर येथील गट विकास अधिकारी श्रीमती अंशुजा गराटे यांची तक्रार केली आहे.
तक्रार अशाप्रकारे आहे की,तेलकामठी ते हेटी (नंदाजी) ग्रा.मा.१९ पांधन रस्त्यावर सीडी वर्क बांधण्याकरिता शेतकरी देविदास बाबुराव तुरणकर यांनी जिल्हा परिषद नागपूर बांधकाम विभागामार्फत ३०५४ अंतर्गत होत असलेल्या पांधन रस्त्याच्या कामामध्ये सी.डी.बांधण्याकरीता कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपुर याच्याकडे ऑनलाईन तक्रार केली असून ती तक्रार निवारणासाठी पंचायत समिती कळमेश्वर येथिल गटविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.
परंतु या तक्रारीवर शेतकऱ्याला तक्रारीची माहिती न देता पंचायत समिती कळमेश्वर येथील गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत तेलकामठी च्या मदतीने “ठेकेदार म्हणते मी करुन देतो”अशा प्रकारचे तोंडी ग्वाहीचे कारण देऊन आर्थिक फायदा घेऊन प्रकरण बंद केले असल्याबाबतची तक्रार शेतकरी देविदास बाबुराव तुरणकर यांनी आज मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपुर यांच्या कडे ऑनलाईन स्वरूपात केली आहे व संपूर्ण विषयाची सखोल चौकशी करून कळमेश्वर पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी यांच्या वर नियमानुसार कारवाई करून सी.डी.वर्कचे काम स्वतः पूर्ण करून देण्याची मागणी शेतकऱ्याने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपुर यांच्याकडे केली आहे.
Home समस्या तेलकामठी येथील शेतकऱ्यांनी केली गटविकास अधिकाऱ्याची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला ऑनलाईन तक्रार




