गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
सावनेर विधानसभेतील सावनेर, कळमेश्वर, खापा आणि मोहपा या चार नगरपरिषदांमध्ये नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी भव्य रॅलीसह शक्तिप्रदर्शन केले. आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करत पक्षाची ताकद दाखवून दिली.
सावनेर नगराध्यक्ष पदासाठी संजना मंदार मंगळे, कळमेश्वरसाठी अविनाश माकोडे, खाप्यासाठी पीयूष बुरडे, तर मोहपा नगराध्यक्ष पदासाठी प्रवीण श्रोते यांनी अर्ज दाखल केला. यासोबतच नगरसेवक पदांसाठीही संबंधित उमेदवारांनी नामांकन दाखल केले.
या शक्तिप्रदर्शन रॅलीदरम्यान परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, अशोक धोटे, धनराज देवके, बापूसाहेब हळदे, रामराव मोवाडे, संदीप उपाध्ये, राजू घुगल, मिनाताई तायवाडे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपच्या या भव्य रॅलीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत रंगत वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
Home राजकीय सावनेर,कळमेश्वर,खापा आणि मोहपा चार नगरपरिषदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल – आमदार डॉ.आशिष देशमुख...




