सावनेर नगरपरिषद मधील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून सलग दोन दिवसांत घटे कुटुंबीयांच्या राजकीय निर्णयांनी सावनेरमधील वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष गोपाल घटे यांनी दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.
याच पार्श्वभूमीवर,दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी, नगरपरिषद निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी, त्यांच्या पत्नी वैशाली गोपाल घटे यांनी नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे नामांकन अर्ज दाखल केला.
नामांकन दाखल करण्यासाठी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घटे कुटुंबाच्या या सलग दोन निर्णायक हालचालीमुळे सावनेरच्या आगामी नगरपरिषद निवडणुकीत नव्या समीकरणांची शक्यता वाढली आहे.
स्थानिक राजकारणात नवा उर्जा संचारत असून, नगराध्यक्षपदाची लढत अधिक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत.
Home राजकीय सावनेरच्या राजकारणात ‘घटे वादळ’ — रा.काँ.(अजित पवार गटात) प्रवेशासोबतच नगराध्यक्ष पदावर वैशाली...




