Home सांस्कृतिक व सामाजिक सावनेरमध्ये राम नवमी शोभायात्रेनिमित्त 26 मार्चला दुपारी 2 ते मध्यरात्रीपर्यंत वाहतूक बदल

सावनेरमध्ये राम नवमी शोभायात्रेनिमित्त 26 मार्चला दुपारी 2 ते मध्यरात्रीपर्यंत वाहतूक बदल

14
0

गिरीश आंदे
नागपूर जिल्हा (ग्रामीण) पोलीस प्रशासनाने सावनेर शहरात 26 मार्च 2026 रोजी होणाऱ्या राम नवमी शोभायात्रेनिमित्त विशेष वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत सावनेर शहरात येणारी जड वाहतूक पूर्णपणे बाह्य वळण (आउटर बायपास) मार्गाने वळविण्यात येणार आहे.
यामध्ये नागपूर-भोपाल (राष्ट्रीय महामार्ग क्र. 47), गोंडखैरी-सावनेर (NH 547E), छिंदवाडा-सावनेर (NH 547) आणि सावनेर-मनसर (NH 753) या मार्गांवरील वाहतुकीचा समावेश आहे.
कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात रोषणाई आणि गर्दीमुळे शहरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तसेच,वाहतूक शाखेमार्फत लाउडस्पीकर, मेगाफोन आणि सूचना फलकांच्या माध्यमातून नागरिकांना माहिती दिली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणीही या अधिसूचनेच्या प्रती लावण्यात येणार आहेत.
प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here