Home सांस्कृतिक व सामाजिक सावनेरमध्ये रामनवमीला विश्वशांतीसाठी भव्य महाआरतीचे आयोजन

सावनेरमध्ये रामनवमीला विश्वशांतीसाठी भव्य महाआरतीचे आयोजन

44
0

गिरीश आंदे
जगातील विविध भागांत सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीमुळे मानवतेवर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सावनेर येथे विश्वशांतीचा संदेश देणारा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रामनवमीच्या पावन निमित्ताने २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नगर परिषद मैदानावर हजारो दीपांच्या प्रकाशात भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या महाआरतीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत एकत्रितपणे दीप प्रज्वलित करून शांती, प्रेम, विकास आणि आशेचा संदेश देणार आहेत. या उपक्रमाद्वारे जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प असून त्याची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये करण्याचा मानस आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन सावनेर-कलमेश्वर मतदारसंघाचे आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. तसेच या ऐतिहासिक सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या पवित्र उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन एक दीप प्रज्वलित करावा आणि विश्वशांतीच्या या महान संकल्पाचा भाग व्हावे, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here