गिरीश आंदे
सावनेर येथील कामाक्षी सेलिब्रेशन येथे तेली युवा एकता मंच व कामाक्षी युनिटी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला तेली समाज वधू-वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला.
समाजातील बांधिलकी जपत नवदांपत्यांना योग्य स्थळ मिळावे, कुटुंबांना विश्वासार्ह व्यासपीठ मिळावे आणि समाजातील एकात्मता अधिक दृढ व्हावी या उदात्त हेतूने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, यंदाचे हे या उपक्रमाचे सलग चौथे वर्ष असून, प्रत्येक वर्षी वाढणारा प्रतिसाद हा समाजाच्या एकतेचे आणि विश्वासाचे प्रतीक ठरत आहे.
या मेळाव्याच्या माध्यमातून विवाहयोग्य युवक-युवती व त्यांच्या पालकांना एकाच ठिकाणी संवाद साधण्याची, ओळखी निर्माण करण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची सुवर्णसंधी मिळाली. कार्यक्रमाला समाजातील कुटुंबांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शेखर सावरबांधे, मनोहरराव घाटोडे, देविदासजी मदनकर, सौ रत्नमाला पिसे, सौ रेखा झोडे (घाटोडे), ॲड. उपेंद्रजी खंते, सौ भारती लोणकर, अशोकजी मानापुरे, महेश चकोले, आशिष मानकर, राजेश हिंगे, अशोक ढोबळे, सौ सोनाली उमाटे, माधवराव बावणकर, सौ चित्रा वाट, योगेश लोखंडे, अशोक उमाटे, अशोक तांडूळकर, ॲड. लांजेवार, हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी आणि सुरेख संचालन सौ कविता पिसे व सौ अश्विनी घाटोडे यांनी अत्यंत उत्कृष्टरीत्या पार पाडले, ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली.
या यशस्वी आयोजनासाठी सौ प्रेरणा अंतुरकर, सौ शुभांगी उमाटे, सौ समृद्धी बलपांडे, सौ कविता पिसे, सौ अश्विनी घाटोडे, सौ डॉ. सुजाता घाटोडे, रमेश घटे, सुरज सेलूकर, लिलेश घटे, मनीष वाट, पियुष घटे, संदीप बावने, अरुण वाडी, डॉ. पराग घाटोडे, अशोक वाघमारे, तेजस बावने, अंकित धांडे, दिशा डोंगरे, रितेश घोलसे, विजय डोंगरे, किशोर महंत, मनोज क्षीरसागर, तन्मय कडू यांनी अथक परिश्रम घेतले.
या मेळाव्यामुळे समाजातील कुटुंबांमध्ये संवाद वाढून अनेक नवीन नात्यांची पायाभरणी झाली असून, अशा उपक्रमांमुळे समाज अधिक संघटित, सशक्त व एकत्र येत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
“आपला समाज – आपली जबाबदारी” या भावनेतून उभारलेला हा उपक्रम समाज एकतेचा आदर्श ठरत आहे.




