सावनेरचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांचा ८ एप्रिल रोजी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा घेण्यात आला. निःस्वार्थ सेवा, जनतेप्रती समर्पण आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांनी अल्पावधीतच जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.
राजकीय वारसा लाभलेल्या देशमुख कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून डॉ.आशीष देशमुख कार्यरत आहेत. त्यांचे वडील रणजितबाबू देशमुख यांनी राज्यात विविध मंत्रीपदे भूषवून आपली छाप उमटवली आहे. तसेच आजोबा अरविंदबाबू यांच्या समाजसेवेचा वारसा त्यांनी पुढे नेला आहे.
डॉ.आशीष देशमुख हे केवळ राजकारणी नसून अभ्यासू,लेखक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली सावनेरमध्ये अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे झाली आहेत. विश्वशांतीच्या उद्देशाने सावनेर येथे आयोजित महाआरतीत ४९११ लोकांनी सहभाग घेत गिनीज बुकमध्ये नोंद केली. तसेच गांधी चौकात १२५ फूट उंच राष्ट्रीय ध्वज उभारण्यात आला.
शेतकऱ्यांच्या हितासाठी १० हजार कोटींचा खत प्रकल्प आणि लिंगा येथे ७० हजार कोटींचा कोल गॅसिफिकेशन प्रकल्प उभारण्यात येत आहे, ज्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे.तसेच लता मंगेशकर हॉस्पिटलच्या माध्यमातून कॅन्सरमुक्त अभियान राबवून आरोग्य क्षेत्रातही मोठे योगदान दिले जात आहे.
दररोज मोठ्या संख्येने नागरिक त्यांना भेटून आपले प्रश्न मांडतात,आणि ते पारदर्शकपणे त्यांचे निराकरण करतात. त्यामुळेच त्यांना ‘जननेता’ म्हणून संबोधले जाते.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांनी अशीच जनसेवा करत राहावी,अशी भावना व्यक्त केली जात आहे.
लेखक – अर्जुन गायकवाड




