गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
डॉ.अभिविलास नखाते यांच्या संकल्पनेतून महासम्राट बळीराजा राष्ट्र सेवा संघाच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय महासम्राट बळीराजा रथयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी शिवतीर्थ टुरिझम, सावनेर येथून सकाळी ७ वाजता सुरुवात करण्यात आली.
या टप्प्यात रथयात्रेने नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मार्गक्रमण केले. स्थानिक नागरिकांनी विविध ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केले आणि बळीराजाच्या विचारांना अभिप्रेत पाठिंबा दिला.
दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजी रथयात्रा परत नागपूर जिल्ह्यात आली. यावेळी कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी गावातील बस स्टँडवर सायंकाळी ७ वाजता दुसऱ्या टप्प्याचा समारोप मोठ्या जल्लोषात पार पडला.
या समारोप प्रसंगी तेलकामठी गावातील नागरिक आणि नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेचा उत्फूर्त सहभाग आणि रथयात्रेला मिळालेलं भरघोस यश हे आगामी सामाजिक परिवर्तनाचे संकेत असल्याचे आयोजक म्हणून डॉ.अभिवलास नखाते यांनी यावेळी सांगितले.
Home Breaking News विदर्भातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद – महासम्राट बळीराजा रथयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा तेलकामठी येथे...




