Home क्रीडा मोवाडे पब्लिक स्कूलचा गौरव – नैतिक श्याम अल्लाडीवार हातोडा फेक स्पर्धेत दुसरा,...

मोवाडे पब्लिक स्कूलचा गौरव – नैतिक श्याम अल्लाडीवार हातोडा फेक स्पर्धेत दुसरा, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र

59
0

कृणाल सातपुते (सावनेर तालुका प्रतिनिधी)
सावनेर
मोवाडे पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नांदागोमुख येथील इयत्ता ११ वी चा विद्यार्थी नैतिक श्याम अल्लाडीवार यांनी १७ ऑक्टोबर २०२५ रोजी चंद्रपुर विद्यापीठाच्या ग्राउंडवर पार पडलेल्या हातोडा फेक विभागीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून आपल्या शाळीचा मान वाढवला. या यशामुळे तो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
शाळा आणि शिक्षक वर्गाच्या वतीने नैतिकच्या या यशाचे उत्कृष्ट अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे सचिव जगदीश जीवतोड़े, अध्यक्ष नंदलाल मोवाडे, प्राचार्या चित्रा मोवाडे , क्रीडा शिक्षक साहिल निघोट , तसेच शिक्षक व शिक्षिका रोशन गाडगे ,प्रविण कसरे , मोनाली भोंगाडे, काजल मोहोतकर, अमित सातपुते , शुभम उदापुरकर यांनी नैतिकचे कौतुक केले.
शाळा प्रशासनाने सांगितले की, “नैतिकच्या मेहनतीला मिळालेला हा परिणाम प्रेरणादायी आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा अभिमान वाढवावा, अशी अपेक्षा आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here