गिरीश आंदे
मराठी साहित्य व रंगभूमीला समृद्ध करणारे थोर साहित्यिक, नाटककार व विनोदी लेखक कै. राम गणेश गडकरी यांच्या १०७ व्या पुण्यतिथीनिमित्त सावनेर येथे आज आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष गोपाल घटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे कार्यकर्ते तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील कै. राम गणेश गडकरी यांच्या निवासस्थानी यानिमित्त विशेष सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमात मान्यवरांनी कै. गडकरी यांच्या अजरामर जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या साहित्यिक योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी तालुकाध्यक्ष सुरेंद्र वानखडे,राजेंद्र वाघाडे,शांताराम अंतुरकर, रोशन वानखडे, भगवान रायकवाड, दिलावर शेख, आशिष माटे, मोहन कानफाडे, शेषराव वाडीकर, प्रमोद ढोले, सोमेश्वर भुसारी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच महिला, विद्यार्थी आणि नागरिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली.
कार्यक्रमातून कै. राम गणेश गडकरी यांच्या साहित्यिक वारशाचे जतन व पुढील पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
Home सांस्कृतिक व सामाजिक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून सावनेरमध्ये कै. राम गणेश गडकरी यांना आदरांजली




