मा.अपर पोलीस महासंचालक, महीला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने दिनांक २०/०१/२०२६ ते २०/०२/२०२६ या कालावधीत संपुर्ण राज्यात हरवलेल्या / पळविलेल्या (अपहरण, अपनयन) बालकांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान शोध मोहीम राबवण्यात येत आहे. नागपुर ग्रामीण जिल्यात या मोहीमे अंतर्गत हरविलेल्या / पळविलेल्या प्रकरणांमधील बालकांचा तसेच आश्रमगृह, अशासकीय संस्था, रेल्वे स्थानके, बसस्थानके, रस्त्यावर भीक मागणारी बालके, बाल मजुरी मध्ये अडकलेल्या बालकांचा सुध्दा शोध घेण्यात येत आहे. नमुद मोहीमे अंतर्गत बालकांचा शोध घेण्याकरीता विविध शोध पथके नेमण्यात आले असुन अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध विभाग, नागपुर ग्रामीण (Anti Human Trafficking Unit), तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन ला १ असे एकुण २१ मिसींग शोध पथक स्थापन करण्यात आले.
नागपुर ग्रामीण पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी हरवलेल्या किंवा पळवलेल्या बालकांच्या शोधात सहकार्य करावे. रेल्वे स्थानके, बसस्थानके, रस्त्यावर भीक मागणारी, बाल मजुरी मध्ये अडकलेली अशा संशयित बालकांबाबत माहिती तात्काळ खालील नमुद क्रमांकावर दयावी किंवा नजिकच्या पोलीस स्टेशनला माहीती दयावी.
संपर्क क्रमांक डायल ११२, पोलीस नियत्रंण कक्ष ७०६६११२१००




